इको-फ्रेंडली मखरांना पसंती
इको फ्रेंडली मखरांना पसंती
बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल
पाली, ता. १८ (वार्ताहर) : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील बाजारपेठा गणेश आरास, मखर व सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. यामध्ये विशेष आकर्षण ठरत आहेत ती इको फ्रेंडली मखरे, ज्यांना यंदा ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीमुळे पर्यावरणपूरक साहित्यापासून बनवलेल्या मखरांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. जिल्ह्यात केवळ मखरविक्रीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने स्थानिक कारागीर व व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पुठ्ठा, प्लायवूड, कापड, सन बोर्ड, इको फ्रेंडली रंग व फुलांचा वापर करून तयार होणाऱ्या या मखरांचा पुनर्वापर वारंवार करता येतो. ही मखरे फोल्डेबल असल्याने सहज उभारता येतात, वाहतूक करता येतात व सुरक्षित ठेवता येतात. अनेकजण वापर झाल्यानंतर ती नातेवाइकांनाही देतात. त्यामुळे त्यांचा टिकाऊपणा व आर्थिक उपयोगिता लक्षवेधी ठरत आहे.
सध्या बाजारपेठेत थ्रीडी व फोल्डेबल मखरांना मोठी मागणी आहे. यात पीओपी, प्लायवूड, झाडांच्या फांद्या व एलईडी रोषणाईचा आकर्षक वापर करण्यात येतो. स्वामी समर्थ, विठ्ठल-रखुमाई, मोराची रचना व विविध शिल्पकलेवर आधारित मखरे नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मखरांची किंमत साधारण दीड हजारांपासून सुरू होऊन मागणीनुसार अधिक आकाराची व डिझाइन असलेली मखरे महागात उपलब्ध होतात.
................
पर्यावरणस्नेही आकर्षक मखर
आर्टिस्ट ओमकार कदम यांनी तयार केलेली ‘मेटल थीम’ मखरेही यंदा चर्चेत आहेत. पुठ्ठ्यापासून तयार झालेली ही मखरे पाण्यात सहज विरघळतात, मात्र लॅकर कोटिंगमुळे धातूप्रमाणे दिसतात. दोन ते १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असलेली ही मखरे पुणे-मुंबईसह राज्यातील अनेक भागांतून मागवली जात आहेत. याशिवाय कापडी मखर विविध आकारांत विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांच्या किमती हजार रुपयांपासून पुढे आहेत. धुवून अनेक वर्षे वापरता येणारी ही मखरे आकर्षक आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरत आहेत.
.......................
अंकुश आपटे, संस्थापक अध्यक्ष, आयुष्यमान व्यसनमुक्ती केंद्र यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी नाममात्र शुल्कात ११ रुपयांना मखरांचे वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरणस्नेही मखरे व शाडूच्या मूर्तींना मिळणारी मागणी हे दिलासादायक चित्र आहे. गणेशोत्सव हा भक्तिभावाचा आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारा उत्सव ठरावा, यासाठी यंदा ग्राहक मोठ्या प्रमाणावर इको फ्रेंडली मखरांना प्राधान्य देत आहेत.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.