गोव्यासाठी कोलाड-भिरा मार्ग

गोव्यासाठी कोलाड-भिरा मार्ग

Published on

गोव्यासाठी कोलाड-भिरा मार्ग
पावसामुळे महामार्गावरील वाहतूक वळवली
पाली, ता. १९ (वार्ताहर)ः मुंबई-गोवा महामार्गाची पावसामुळे वाताहत झाली आहे. अशातच माणगावजवळचा कळमजे पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवारी (ता. १९) मुंबई-गोवा महामार्गावरील गोव्याकडे जाणारी वाहतूक कोलाड-भिरा फाट्यावरून वळवण्यात आली.
गोव्याकडे जाणारी वाहने विळे, भागड, निजामपूरमार्गे माणगाव येथून पुढे मार्गस्थ होणार आहे. यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-------------------------------------------
पाली ः मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोलाड-भिरा फाट्यावरून पुढे मार्गस्थ होत आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com