भांडवलदारांमुळे जमिनींची दुर्दशा

भांडवलदारांमुळे जमिनींची दुर्दशा

Published on

भांडवलदारांमुळे जमिनींची दुर्दशा
मेढेखार परिसरातील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी मेढेखार, कुसुंबळे परिसरातील हजारो एकर जमीन काही कंपन्यांनी खरेदी केली आहे; परंतु या ठिकाणी आजतागायत एकही प्रकल्प सुरू झाला नसल्याने खरेदी केलेल्या जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवार (ता. ९) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
अलिबाग तालुक्यातील मेढेखार, कुसुंबळे, कातळपाडा, काचली, पिटकीरी, खातविरे गावातील ३८० शेतकऱ्यांच्या जमिनी मे. पटनी एनर्जी प्रा.लि., गायत्री लॅण्ड रिॲलिटी प्रा.लि., हिंगलज लॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., गणेश लॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., देवर्षी लॅण्ड प्रा.लि. यांसारख्या नऊ कंपन्यांनी शेतीविषयक व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली खरेदी केल्या. रोजगार मिळेल या आशेने शेतकऱ्यांनीही जमिनी विकण्यास तयारी दर्शवली; परंतु जमिनी खरेदी करून १५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन कंपन्यांनी उद्योग सुरू केलेला नाही. या कंपन्यांनी जमिनीवर प्रकल्प उभारले नाहीत. आजपर्यंतच्या कालावधीत येऊन गेलेले सर्व पूर, महापूर, समुद्राला आलेल्या मोठ्या भरत्या, उधाणांमुळे जमिनीची धूप होऊन खाडीच्या पाण्यात गेलेली आहे.
-----------------------------------------
शासनाचे दुर्लक्ष
शासनाच्या पाटबंधारे, खारलॅण्ड कार्यालयाने लक्ष दिले नाही. जमिनीच्या जागेत समुद्र वनस्पती, खारफुटींचे जंगल वाढलेले आहे. शेतजमिनी पूर्णपणे ओसाड, नापीक झाल्या आहेत. या भांडवलदार कंपन्यांमुळे जमिनींची दुर्दशा झाली आहे. तरीही शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com