बांबूतून हरितक्रांतीकडे वाटचाल
बांबूतून हरितक्रांतीकडे वाटचाल
रायगडमध्ये पारंपरिक भातशेतीला पर्याय
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.१८ : कृषीप्रधान रायगड जिल्ह्यात पारंपरिक भातशेतीच्या जोडीला बांबू लागवडीची जोड मिळाली आहे. पर्यावरणाचे रक्षण करत आर्थिक समृद्धी साधण्याची क्षमता बांबूमध्ये असल्याने जिल्ह्याची नव्या हरितक्रांतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
हवामान बदलाचे दुष्परिणाम, अनियमित पाऊस आणि शेतीत येणाऱ्या विविध समस्यांमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत, बांबूची लागवड एक आश्वासक पर्याय म्हणून समोर येत आहे. जिल्ह्यातील दरडप्रवण भागात बांबूलागवड वरदान ठरत आहे. पोलादपूर, महाड तालुक्यात दरडप्रवण भागात मोठ्याप्रमाणात लागवड करण्यात आली असून या लागवडीकडे येथील शेतकरी शाश्वत शेती साधन म्हणून पाहु लागले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला होता. जिल्ह्यातील ४१ रोपवाटीकांमध्ये बियाणांची उगवण करुन पावसाळ्यात साधारणपणे १ लाख ४९ हजार रोपे विविध संस्थांच्या माध्यमातून लावण्यात यश आल्याची माहिती सामाजिक वनिकरण विभागाचे वनक्षेत्रपाल स्वप्नील धुरे यांनी दिली. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीची पूर्वतयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------
लागवडीचे अनेक फायदे
पाणी, माती संवर्धन : बांबूची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे पावसाळ्यात होणारी मातीची धूप थांबते. तसेच, कमी पाण्यातही बांबूची वाढ चांगली होते, ज्यामुळे पाण्याची बचत होते.
कार्बन उत्सर्जन कमी : इतर झाडांच्या तुलनेत बांबू मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि ऑक्सिजन बाहेर टाकतो, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
शाश्वत उत्पन्नाचा स्रोत : एकदा लागवड केल्यावर बांबूचे पीक अनेक वर्षांपर्यंत उत्पन्न देते. याचा उपयोग फर्निचर, हस्तकला, बांधकाम, आणि अगदी कापड उद्योगातही होतो, ज्यामुळे बांबूवर आधारित अनेक लघु आणि कुटीर उद्योग सुरू होऊ शकतात.
जमिनीची धूप थांबवणे : बांबूची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते.
जैवविविधतेचे संवर्धन: बांबूची वने अनेक वन्यजीवांसाठी नैसर्गिक अधिवास म्हणून काम करतात.
रोजगार निर्मिती : बांबू लागवड, प्रक्रिया आणि विक्री उद्योगांमुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.