सुधागडच्या ‘साई फुड्स’ प्रकल्पाची उंच भरारी
सुधागडच्या ‘साई फुड्स’ प्रकल्पाची उंच भरारी
दिल्लीतील वर्ल्ड फूड इंडिया एक्स्पोमध्ये निवड
पाली, ता. २९ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावातील अक्षता अधिकारी यांनी सुरू केलेल्या ‘साई फुड्स’ या फळप्रक्रिया उद्योगाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे. दिल्ली येथे होणाऱ्या वर्ल्ड फूड इंडिया एक्स्पो या प्रतिष्ठित अन्नप्रक्रिया प्रदर्शनासाठी या प्रकल्पाची निवड झाली असून, हा रायगड जिल्ह्यासाठी आणि विशेषतः महिला उद्योजकतेसाठी मोठा गौरव मानला जात आहे.
अक्षता अधिकारी या ‘पल्पा’ या ब्रँडच्या नावाने आंबा जाम, पल्प, जेली, चॉकलेटसह विविध फळप्रक्रिया उत्पादने तयार करतात. त्यांच्या उद्योगामुळे आज सुमारे ७० ते ८० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाचा महिलाकेंद्रित उपक्रम ठरत आहे. या प्रदर्शनात ७२ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, सुधागड तालुक्यातील साई फुड्सची निवड हा निश्चितच जागतिक स्तरावरचा अभिमानाचा क्षण आहे. सुधागड तालुक्यातील हा प्रकल्प प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उभारण्यात आला आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली फरसाण, राईस मिल, फळप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थनिर्मिती, बेकरी उद्योग असे विविध व्यवसाय या योजनेतून विकसित झाले आहेत. तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाला दिशा मिळाली. तसेच जिल्हा संशोधन व्यक्ती अभिजित जाधव आणि नाशिकच्या दुर्गा महिला बहुउद्देशीय विकास संस्थेचे सहकार्य लाभले आहे.
.............
आमदारांचे सहकार्य
या प्रकल्पाच्या निवडीबाबत आमदार रवींद्र पाटील यांनी अक्षता अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या असून अर्थसहाय्यही प्रदान केले आहे. तालुक्यातील शेतकरी व महिला बचत गटांनी अन्नप्रक्रिया उद्योगात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार पाटील आणि तालुका कृषी अधिकारी दयावंती कदम यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.