दीडहजार नौका आश्रयाला
दीड हजार नौका आश्रयाला
वादळामुळे रायगडमधील बंदरात मुक्काम
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २९ : उसळणाऱ्या लाटा, वाऱ्यांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या दीड हजार नौका तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये आश्रयाला होत्या, पण सोमवारी वातावरण शांत होण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा परतीच्या मार्गाला लागल्या आहेत.
रायगडच्या सागरी हद्दीत मुंबई, गुजरात येथील मच्छीमार मोठ्या संख्येने येतात. सध्याच्या वादळी परिस्थितीत राजपुरी-दिघी, एकदरा, मजगाव, ताराबंदर, रेवदंडा, साखर-आक्षी, वरसोली, बोडणी, मांडवा आणि करंजा बंदरात दुसऱ्या बंदरातील मच्छीमार नौका शुक्रवारी दुपारपासून आश्रयाला आलेल्या आहेत. यात गुजरात राज्यातील नौकांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. आकाराने मोठ्या असलेल्या या नौका परतीच्या तयारीत असून, त्यांनी इंधन, रेशन भरून घेतले आहे. बाहेरून आलेल्या या मच्छीमारांनी येथेच पकडलेली मासळी लिलावात विकली. आश्रयाला आलेल्या मच्छीमारांचा मच्छीमार सोसायट्यांनी योग्य पाहुणचार केला. सोमवारी सायंकाळी या नौका परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत, अशी माहिती अलिबाग येथील सत्यजीत पेरेकर यांनी दिली.
---------------------------------------
६०० नौका जिल्ह्याबाहेर
रायगड जिल्ह्यातील ६०० हून अधिक नौका निवासी बंदरात परत येऊ शकल्या नव्हत्या. जिल्ह्याबाहेर अडकलेल्या मच्छीमारांबरोबर संपर्क होत असून, कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून सांगण्यात आले. अशात वादळी परिस्थितीदेखील निवळत असल्याने मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे, तर बंदर, मत्स्यविभाग सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
़़़़़़़़़़़़़़़़ः--------------------------------------
मच्छीमारांचा योग्य पाहुणचार
अरबी समुद्रातील परिस्थितीमुळे समुद्रात मासेमारी करणे धोकादायक झाले होते. त्यामुळे मासेमारी नौकांनी सुरक्षित बंदरात आश्रय घ्यावा, अशा स्पष्ट सूचना हवामान खात्याने दिल्या होत्या. गुजरातहून आलेल्या मासेमारी नौकांनी राजपुरी, साखर-आक्षी, करंजा-मोरा बंदरात आश्रय घेतला. जिल्ह्यात आलेल्या या मच्छीमारांना आवश्यक वस्तू, इंधन, योग्य पाहुणचार देऊन रवानगी करण्यात आली.
-----
आश्रयाला आलेल्या मच्छीमारांना सुविधा पुरवणे, आमचे कर्तव्य आहे. राजपुरी हे सुरक्षित बंदर असल्यामुळे ४०० नौका येथे होत्या. आश्रयाला आलेल्या मच्छीमारांनी इंधन, रेशन साहित्य घेतल्यानंतर सायंकाळपासून परतीचा प्रवास सुरू केला आहे.
- विजय गिदी, महालक्ष्मी मच्छीमार सोसायटी, राजपुरी
----
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली स्थिती आता बदलत आहे. सोमवारी ऑरेंज अलर्ट आहे, त्यानंतर वातावरण स्थिर होत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे मच्छीमारांसाठी धोक्याची स्थिती नाही.
- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.