फणसाडमधील वनसंपदा धोक्यात
फणसाडमधील वनसंपदा धोक्यात
वन्यजीवांच्या शिकारीबरोबर वृक्षतोडीचे प्रकार
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, (ता. ३) : रायगड जिल्ह्यातील जैवविविधतेने नटलेल्या फणसाड अभयारण्य वनसंपदा संकटात सापडली आहे. संरक्षित क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या शिकार केली जात असून, विविध झाडांची कत्तल केली जात आहे. त्यामुळे वन विभाग, पोलिस यंत्रणेकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुरूड, रोहा तालुक्यांमध्ये पसरलेले फणसाड अभयारण्य विविध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. ६९.७९ चौरस किलोमीटर विस्तारलेल्या अभयारण्यातील वनसंपदेची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. पूर्वीप्रमाणे येथे झाडे नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे आहे. अभयारण्य परिसरातील ३८ गावांमधून वनसंपदेच्या लुटीबाबत वन विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत, परंतु त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अभयारण्याच्या परिसरात वन्यजीवांची शिकार केली जात असून, पीक खाण्यासाठी वन्यजीव मानवी वस्तीत येत असल्याने त्यांची शिकार केली जात आहे.
--------------------------------------------------
वन विभागाचे दुर्लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अलिबाग तालुका अध्यक्षांच्या घरातून संरक्षित वन्यजीव असलेल्या भेकर प्राण्याचे मांस आढळले होते. वन्यप्राण्यांबरोबरच बहुमोल वृक्षांची तोड होत आहे. नुकतेच बेलवाडी येथे खैर लाकडाची तस्करीचा प्रयत्न स्थानिकांनी उधळला होता. यासंदर्भात तक्रार करूनही शेतकऱ्याची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---------------------------------------
या भागात असलेल्या बहुमूल्य वनसंपदेचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ज्या शेतकऱ्यांना वन्यजीवांपासून त्रास होत असेल, तर त्यांनी वन विभागाकडे तक्रार करणे आवश्यक आहे. कोणतीही घटना घडण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- वर्षा पौळ, वन परिक्षेत्र अधिकारी, मुरूड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

