नवघर शाळेत ‘गुड टच–बॅड टच’वर मार्गदर्शन

नवघर शाळेत ‘गुड टच–बॅड टच’वर मार्गदर्शन
Published on

नवघर शाळेत ‘गुड टच–बॅड टच’वर मार्गदर्शन
लेक शिकवा अभियानांतर्गत किशोरवयीन मुलींना स्व-संरक्षणाचे धडे
पाली, ता. १२ (वार्ताहर) : सध्याच्या बदलत्या सामाजिक वातावरणात मुलींनी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होणेच नव्हे, तर स्वतःच्या आरोग्याबाबत आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत सजग राहणे तितकेच आवश्यक बनले आहे. याच उद्देशाने आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद नवघर आदर्श शाळेत सोमवारी (ता. १२) राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून ‘लेक शिकवा अभियान’ अंतर्गत ‘गुड टच–बॅड टच’ तसेच किशोरवयीन आरोग्य या विषयांवर विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती लहरिया यांनी इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थिनींना सुरक्षित स्पर्श (गुड टच) आणि असुरक्षित स्पर्श (बॅड टच) यातील फरक सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजावून सांगितला. आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे, हे पटवून देताना त्यांनी एखादा स्पर्श चुकीचा किंवा अस्वस्थ करणारा वाटल्यास घाबरून न जाता ठामपणे “नाही” म्हणण्याचे धैर्य ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ विश्वासू व्यक्ती, पालक, शिक्षक किंवा संबंधित यंत्रणेकडे मदत मागावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. आरोग्य सेविका सुवर्णा दुर्गे यांनी किशोरवयीन अवस्थेत शरीरात होणारे नैसर्गिक बदल, मानसिक स्थिती तसेच मासिक पाळीच्या काळात पाळावयाची वैयक्तिक स्वच्छता याबाबत सविस्तर माहिती दिली. या वयात निर्माण होणाऱ्या शंका, भीती किंवा गैरसमज दूर करून आरोग्याची योग्य काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक संगीता बैकर यांनी केले, तर आभार विषय शिक्षिका वृषाली गुरव यांनी मानले.
.........................
चौकट : आत्मविश्वास वाढला
या मार्गदर्शनामुळे आम्हा मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून स्वतःच्या सुरक्षेबाबत अधिक सजग राहण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनी सृष्टी अडसूळ हिने व्यक्त केली. या उपक्रमाला इयत्ता सहावी ते आठवीतील सर्व विद्यार्थिनी, महिला शिक्षिका, शिक्षक व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालकांनी आरोग्य विभागाचे मनःपूर्वक आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com