तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी मोर्चा

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी मोर्चा
Published on

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यासाठी मोर्चा
दिव्यांग संघर्ष समितीचा निर्णय
अलिबाग, ता. ३ (बातमीदार) : तुकाराम मुंढे यांची दिव्यांग मंत्रालयातून करण्यात आलेली बदली तातडीने रद्द करा, या मागणीसाठी दिव्यांग संघर्ष समितीने गुरुवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुंढे यांच्या बदलीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
दिव्यांग विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी विभागाच्या कामकाजात मोठे फेरबदल केले. जे दिव्यांगांच्या हिताचे होते. पूर्वी दिव्यांगांना शासकीय लाभासाठी शासकीय कार्यालयाकडे खेटे मारावे लागत होते, परंतु दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी ॲप तयार करून घरबसल्या समस्यांचे निवारण करण्याची व्यवस्था केली. २४ तासात तक्रारींचे निवारण करण्याची व्यवस्था केली. विभागाचे काम कागदविरहित आणि ऑनलाइन केले.
दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची अनाकलनीय पद्धतीने बदली करण्यात आली. त्यामुळे दिव्यांगांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
ही बाब लक्षात घेऊन तुकाराम मुंढे यांची बदली तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी रायगडच्या दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. बदली रद्द झाली नाही, तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. साईनाथ पवार, बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
.............
फोटो ओळ : तुकाराम मुंढे यांची बदली तातडीने रद्द करा या मागणीसाठी दिव्यांग संघर्ष समितीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com