पाली शहरात अद्ययावत नवीन यंत्रणांचे लोकार्पण

पाली शहरात अद्ययावत नवीन यंत्रणांचे लोकार्पण
Published on

पाली शहरात अद्ययावत नवीन यंत्रणांचे लोकार्पण
स्वच्छतेसाठी नगर पंचायतीचे प्रभावी पाऊल
मैला व्यवस्थापन वाहन, पाणी टँकर आणि कापडी पिशवी वेंडिंग मशीन ताफ्यात दाखल
पाली, ता. ८ (वार्ताहर)ः पाली शहराच्या नागरी सुविधांमध्ये मोलाची भर घालत, पाली नगर पंचायतीच्या वतीने विविध उपयुक्त यंत्रणांचे लोकार्पण बुधवारी (ता. ६) उत्साहात पार पडले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि नगर पंचायतीच्या विशेष निधीतून नागरिकांच्या सेवेसाठी मैला व्यवस्थापन गाडी, पाणी टँकर आणि कापडी पिशवी वेंडिंग मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, पाली व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आलाप मेहता, माजी उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, शिवसेना शहरप्रमुख ओमकार खोडागळे, नगरसेवक सुधीर भालेराव, ज्येष्ठ नेते ग. रा. म्हात्रे, नगरसेविका जुईली ठोंबरे, नगरसेवक सुधाकर मोरे, सोहम खोडगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व पूजन करून या सर्व यंत्रणांचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी नगर पंचायतीचे अन्य सदस्य, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
आधुनिक मैला व्यवस्थापन वाहन
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत शासनाकडून हे वाहन प्राप्त झाले आहे. तीन केएलडी क्षमतेचे हे वाहन दिवसाला सरासरी चार ते पाच शौचालय टाक्या साफ करू शकते. कर्मचाऱ्यांचे तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण होताच हे वाहन प्रत्यक्ष सेवेत दाखल होईल, ज्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

चौकट
प्लॅस्टिक मुक्तीसाठी पिशवी वेंडिंग मशीन
पर्यावरण रक्षणासाठी पाली बाजारपेठ येथील जुन्या गोडाऊनजवळ हे मशीन बसवण्यात आले आहे. १० रुपयांचे नाणे टाकल्यास नागरिकांना तातडीने कापडी पिशवी उपलब्ध होईल. एका वेळी ३०० पिशव्यांची साठवणूक करण्याची याची क्षमता आहे. प्रतिसाद पाहून शहरात अन्य ठिकाणीही अशी यंत्रणा बसवली जाणार आहे.

चौकट
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास नागरिकांना तातडीने पाणी पुरवठा करण्यासाठी नगर पंचायतीने पाच हजार लिटर क्षमतेचा स्वतःचा टँकर खरेदी केला आहे. सशुल्क तत्त्वावर ही सुविधा गरजू नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल.

कोट
पाली शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवून या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. प्लॅस्टिकमुक्त पाली आणि स्वच्छ पाली हे आमचे ध्येय असून, नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा.
- पराग मेहता, नगराध्यक्ष, नगर पंचायत पाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com