नागाव हायस्कूलमध्ये अमृत वर्ग

नागाव हायस्कूलमध्ये अमृत वर्ग
Published on: 

नागाव हायस्कूलमध्ये अमृत वर्ग
मोबाईलचा अतिवापर टाळून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, शिस्त आणि वाचनाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न
अलिबाग, ता. ११ : विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवून त्यांच्यात अभ्यासाची आवड, एकाग्रता, शिस्त आणि सकारात्मक विचार रुजविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेतर्फे नागाव हायस्कूलमध्ये ‘अमृत वर्ग’ उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यांच्यात जीवनमूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पालघर येथील कैलास कुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमृत वर्गाची संकल्पना, उद्दिष्टे आणि भविष्यातील प्रगतीसाठी त्याचे महत्त्व स्पष्ट केले. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून अभ्यास, ज्ञानार्जन आणि कौशल्यविकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाचनाची आवड, आत्मविश्वास, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार आणि जीवनातील मूल्यांची जाणीव करून देण्यावरही भर देण्यात आला.

पदाधिकाऱ्यांचे सहकार्य
या वेळी अमृतचे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे, उपव्यवस्थापक मंगेश ढेबे उपस्थित होते. संस्थेच्या संचालक मंडळातील स्नेह जोशी, कार्याध्यक्षा मंदा आठवले, अध्यक्ष मंगेश आठवले, सदस्य संदीप ढापरे आणि मुख्याध्यापक अजित पाटील यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचे उपक्रमासाठी सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com