आरक्षण, शेतकरीप्रश्‍न महिनाभरात मार्गी लावा

आरक्षण, शेतकरीप्रश्‍न महिनाभरात मार्गी लावा

Published on

आरक्षण, शेतीप्रश्‍न महिनाभरात मार्गी लावा
मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. २ : आरक्षणाचा शासन निर्णय मंत्रिमंडळाने काढला आहे. सध्या आपत्तीचा काळ असल्याने अंमलबजावणीस उशीर होत असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना आपण आणखी महिनाभराचा वेळ देऊ. तसेच मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने महिनाभरात भरीव मदतीसह विविध उपाययोजना कराव्यात अन्यथा कोणत्याही एका जिल्ह्याच्या सीमेवर शेतकऱ्यांची बैठक बोलावून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला दिला.
श्री क्षेत्र नारायण गडावर गुरुवारी (ता. २) जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा झाला. मेळाव्यासाठी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, अनिल जगताप, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. मनोज जरांगे म्हणाले, की समाजासाठी आयुष्य झिजवले, कधी खोटे बोललो नाही आणि बेइमान झालो नाही. समाजाने उथळ वागू नये, आणखी मिळेल. मिळेपर्यंत शांत राहा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. समाजाने आता शासक आणि प्रशासकही बनावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांत दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करावा. हेक्टरी ७० हजार रुपयांची मदत द्यावी. शेती वाहून गेलेल्यांना एक लाख ३० हजार रुपये हेक्टरी भरपाई द्यावी. जनावरे, खळे, शेळ्या, कांदे वाहून गेलेल्यांचे शेतकरी म्हणतील तसे पंचनामे करून भरपाई द्यावी. ट्रिगर रद्द करून पीक विमा द्यावा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, पिकांना हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशा मागण्या त्यांनी केल्या.
...
इतर समाजाला दोष देऊ नये!
आपल्याबद्दल कोणी नेता बोलला तर जातीला अंगावर घेऊ नये. विशिष्ट नेते आणि त्यांची लाभार्थी टोळी सोडली तर इतर समाजाला दोष देऊ नये, असे आवाहन जरांगे यांनी त्यांनी केले. ज्यांना जातीतही किंमत नाही असे लोक माध्यमांत चर्चेत राहावे, संरक्षण मिळावे म्हणून प्रयत्नात असतात. त्यांच्या अंगावर जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
...
मदत करा; जातपात बघू नका!
जरांगे यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. मदतीवेळी कोणतीही जातपात बघू नये. सर्वांना माणुसकीच्या नात्याने मदत करा, असे आवाहन केले.
...
उद्योगपतींकडून पैसे घ्या!
आपत्ती निवारणासाठी उसाचे पैसे कपात करण्यावरून टीका करताना, नोकरदारांचे २५ टक्के वेतन कापावे. निवडणुकीत उद्योगपतींकडून पैसे घेता, आता शेतकऱ्यांसाठी घ्यावेत, असे आवाहन जरांगे यांनी सरकारला केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com