तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

जामनेरमधील घटना; कारण अस्पष्ट, तपास गतीने सुरू

सकाळ वृत्तसेवा
जामनेर, ता. १५ : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील अंगरक्षक, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने बुधवारी (ता. १५) जामनेर गणपतीनगरातील निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) असे या अंगरक्षकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
प्रकाश कापडे हे गेल्या पंधरा वर्षांपासून राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत होते. त्यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडेही सुरक्षाव्यवस्थेतील अंगरक्षक म्हणून काम केले होते. सध्या ते सचिन तेंडुलकर यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत अंगरक्षक म्हणून तैनात होते. आठवडाभरापूर्वी ते जामनेरमधील आपल्या निवासस्थानी परतले होते. बुधवारी (ता. १५) पहाटे निवासस्थानीच कापडे यांनी स्वतःच्या आत्मसंरक्षण शस्रातून (सर्व्हिस रिव्हॉल्व्हर) डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर कुटुंबीयांनी कापडे यांच्या खोलीकडे धाव घेतली, त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. या घटनेची माहिती जामनेर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी आधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखले केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
*********
फोटो : JMN24B03836 प्रकाश कापडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com