Fri, March 24, 2023

वरदविनायकाच्या चरणी भक्तांची मंदियाळी
वरदविनायकाच्या चरणी भक्तांची मंदियाळी
Published on : 9 February 2023, 12:15 pm
खोपोली, ता. ९ (बातमीदार) ः संकष्टीचतुर्थी निमित्त अष्टविनायक क्षेत्र, महड येथे वरदविनायकाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. शहर व परिसरातील हजारो गणेशभक्त पहाटे चार वाजता पायी चालत महड येथे वरदविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. महाआरतीनंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता. भाविकांना सोयीसाठी मंदिर व्यवस्थापन समितीकडून विशेष उपाययोजना करण्यात येतात.
खोपोली : पहाटे पायी चालत गणेश भक्त महडमध्ये दाखल झाले होते.