नव्या पिढीत मातृभाषेचे मूल्यसंस्कार आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या पिढीत मातृभाषेचे मूल्यसंस्कार आवश्‍यक
नव्या पिढीत मातृभाषेचे मूल्यसंस्कार आवश्‍यक

नव्या पिढीत मातृभाषेचे मूल्यसंस्कार आवश्‍यक

sakal_logo
By

खोपोली, ता. १ (बातमीदार) ः मायबोली मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न असा इतिहास आहे. भाषेत व्यक्ती, समाज व संस्कृती घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. लहानपणापासूनच भाषेचे योग्य संस्कार मिळाले, भाषा विकासाला योग्य दिशा दिली तर नवी पिढी भाषेबाबत सजगता होईल. मराठी भाषेला वैभव संपन्न करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देण्याची गरज असल्‍याचे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्‍त केले.
खोपोली शाखेच्या अध्यक्ष कवयित्री उज्वला दिघे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पत्रकार नितीन भावे, वसंत देशमुख मेमोरिअल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष उल्हासराव देशमुख, के.एम.सी. महाविद्यालयाचे मराठी भाषा प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नवरे आदी उपस्‍थित होते.
काळाबरोबर मराठी भाषेसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. भाषेचे जतन आणि संवर्धनासाठी व्यक्ती, कुटुंब, शिक्षणसंस्था, साहित्यिक व सामाजिक संस्था आणि राज्यशासन या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून भाषा विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केएमसी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नवरे यांनी केले.
‘कोमसाप’ बालविभागाचे प्रमुख प्रकाश राजोपाध्ये, शाखेच्या उपाध्यक्ष सुधा इतराज, कार्यवाह जयश्री पोळ, कोषाध्यक्ष वामनराव दिघे, जिल्हा प्रतिनिधी कवयित्री रेखा कोरे, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनिलकुमार रानडे, चौक कोमसाप शाखेचे अध्यक्ष यशवंत सपकाळ आदी उपस्थित होते.
कवयित्री रेखा कोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मधुमिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

खोपोली : कुसुमाग्रज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.