जिल्‍ह्यात आपची स्‍वराज्‍य यात्रा

जिल्‍ह्यात आपची स्‍वराज्‍य यात्रा

खोपोली, ता. ३१ (बातमीदार) ः आम आदमी पक्ष महाराष्ट्रसह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा २८ मे रोजी पंढरपूर येथून विठोबाचे दर्शन घेऊन सुरू झाली आहे. १० दिवसांत ७८२ किलोमीटरचा पल्ला गाठून ६ जून २०२३ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष असल्याचे औचित्य साधून रायगड किल्ल्यावर ही यात्रा पोहोचणार आहे.
यात्रा पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, दौंड, बारामती, फलटण, विटा, तासगाव, पलूस, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवडमार्गे ४ जून सकाळी दहाच्या दरम्यान खोपोलीत पोहोचेल. त्‍यानंतर नवी मुंबई, ठाणे, पनवेलमार्गे पेण, कोलाड, माणगाव, महाड ते पाचाडपर्यंत प्रवास करेल. ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येईल.
आम आदमी पक्षाला जनसामान्यांमध्ये पोहोचवणे, जनाधार तयार करणे, नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणे, जनजागृती करणे, हा यात्रेचा उद्देश असल्‍याचे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी डॉ. रियाज पठाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com