अध्यक्षपदी अतिक खोत यांची नियुक्ती

अध्यक्षपदी अतिक खोत यांची नियुक्ती

Published on

खोपोली (बातमीदार) ः शहरातील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी विकसक अतिक खोत यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी संध्याकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व लायन्स सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. लायन्स क्लबचे जिल्हा गव्हर्नर राजेश प्रजापती यांनी नूतन अध्यक्ष अतिक खोत व अन्य पदाधिकाऱ्यांना कर्तव्य आणि जबाबदारीची शपथ देऊन पदभार सोपविला. तत्‍पूर्वी वर्षभरात लायन्स क्लबकडून पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांचा आढावा मावळत्या अध्यक्ष शिल्पा मोदी, सचिव संगीता पिल्लई, खजिनदार अनुराधा कट्टी यांनी सर्वांसमोर ठेवला. नवनियुक्ती अध्यक्ष खोत यांनी येणाऱ्या वर्षांतील प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. यात सर्व सुविधांयुक्त आरोग्य निदान केंद्राची निर्मिती, आरोग्य सेवा उपक्रम, नगरपालिका शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा केली. यासाठी व्यक्तिगत पातळीवर पाच लाखांची निधीही दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोलीचे सहायक पोलिस निरीक्षक कालसेकर, ज्‍येष्ठ नेते मोहन औसरमल, माजी उप नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्यासह खोपोली व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ संगीता वानखेडे, सर्पमित्र भक्ती साठेलकर, गतिमंद मुलांसाठी शाळा चालविणाऱ्या शालेम एज्युकेशन सोसायटी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

खोपोली : शहरातील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अतिक खोत यांची निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.