पावसाळी पर्यटन बहरणार
अनिल पाटील, खोपोली
पावसाच्या आगमनाने सह्याद्रीच्या पर्वतरांगातून खळखळणारे झरे, धबधबे वाहू लागले आहेत. खंडाळा घाट परिसर हिरवाईने नटला आहे. दाट धुके व कधी रिमझिम कधी जोरदार सरीत चिंब भिजत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले खोपोली व खंडाळा घाटाकडे वळत आहेत. वीकेण्ड तसेच सुटीच्या दिवशी हजारो पर्यटक एक दिवसीय सहलीसाठी खोपोलीला पसंती देत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह विविध सामाजिक संस्थाही सज्ज आहेत. शहरातील हॉटेल्स, धाबे, रेस्टॉरंट, खाऊची दुकानांमध्ये गर्दी वाढल्याने आर्थिक उलाढालीला गती आली आहे.
आवश्यक खबरदारी
पावसाचा अंदाज घेऊनच सहलीचे बेत आखावे. अतिवृष्टी काळात सुरक्षित ठिकाणी फिरण्याला प्राधान्य द्यावे.
अतिउत्साहात खोल डोह, नदीत जाणे टाळावे. माहिती नसलेल्या, दुर्लक्षित, आडमार्गाच्या ठिकाणी जाणे टाळावे.
आपत्कालीन मदत
कोणतीही असुरक्षित किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास स्थानिक पोलिस, आपत्कालीन मदतीला धावून येणाऱ्या सामाजिक संस्थांशी तातडीने संपर्क साधावा. यासाठी स्थानिक पोलिस, अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, यशवंती हायकर्स, सहज सेवा फाउंडेशन आदी संस्थांची मदत घेता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

