social program in navratra celebration at yavatmal
social program in navratra celebration at yavatmal

Navratra: सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा यंदा खोपोलीत उच्चांक! राजकीय नेत्यांचे शक्तिप्रदर्शन

खोपोली, ता.२४(बातमीदार)ः सार्वजनिक नवरात्रोत्सवाचा यंदा खोपोलीत उच्चांक नोंदवण्यात आला आहे. खोपोली पोलिस स्टेशन तसेच नगरपालिका हद्दीत जवळपास ८० च्यावर सार्वजनिक मंडळांतर्फे देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सार्वजनिक नवरात्र महोत्सवांना भेटी देत आगामी निवडणुकांसाठी शक्तीप्रदर्शन करत आहेत.

आगामी विधानसभा, नगरपालिका निवडणुकांमुळे यंदा सणासुदीला राजकीय वलय आल्याचे चित्र दिसत आहे. कर्जत-खालापूर विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे, शिवसेना नेते नितीन सावंत तसेच माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हेच संभाव्य उमेदवार असल्याचे स्पष्ट आहे. तर खोपोली नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपक शेंडे, डॉ. सुनील पाटील, अमोल जाधव किंवा रूपाली जाधव यांच्यातच लढत असे बोलले जात आहे. त्यामुळे या सर्व संभाव्य उमेदवारांनी नवरात्रोत्सवानिमित्ताने थेट मतदारांशी संवाद साधण्यासाठीची जोरदार प्रयत्न केले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या राजकीय नेत्यांनी शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत नेतेमंडळी मंडळांना भेटी देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com