कर्जतमध्ये फेरमतदानाची मागणी

कर्जतमध्ये फेरमतदानाची मागणी

कर्जतमध्ये फेरमतदानाची मागणी

खोपोली, ता. १४ (बातमीदार) ः ऐन मतदानाच्या दिवशी सोमवारी (ता.१३) दुपारी साडेतीन ते पाचच्या सुमारास कर्जत, खोपोली व खालापूर परिसरात जोरदार गारपीट, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. वादळी पावसामुळे मतदानावर विपरित परिणाम होऊन इच्छा असूनही अनेक नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदानक्षेत्रात फेर मतदान घेण्याच्या मागणीचे पत्र महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे. या संदर्भात गरज पडल्यास, उच्च स्तरावर पाठपुरावा करू, असेही बारणे सांगितले.
कर्जतमध्ये जवळपास सर्वच ठिकाणी दीड तास वादळी पावसामुळे मतदान प्रक्रिया विस्कळित झाली होती. त्यामुळे मतदान टक्काही कमी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com