कंटेनर-कारवर उलटल्याने अपघात

कंटेनर-कारवर उलटल्याने अपघात
Published on

खोपोली, ता. २१ (बातमीदार)ः जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटातील बॅटरी हिलजवळ कंटेनर आणि कारमध्ये झालेल्या अपघात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारवर उलटल्याने हा अपघात झाला आहे.
लोणावळ्याकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात तीव्र उताराबरोबर असलेल्या वळणावर सोमवारी (ता. २०) रात्री दहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनर क्रमांक (एम.एच.१४ एफ.टी.१४४५) हा समोरून येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १४ बीएक्स१६०५) उलटल्याने झालेल्या अपघातात तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जणांपैकी कविता चौधरी आणि दत्तात्रय चौधरी (राहणारे -तळेगाव) यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला; तर योगेश चौधरी (वय ४०), जान्हवी चौधरी (वय ३१), दिपांशा चौधरी (वय ९), जिगिशा चौधरी (वय १.५), मितांश चौधरी (वय ९) आणि भूमिका चौधरी (वय १६) किरकोळ जखमी आहेत.
---------------------------
जखमींवर रुग्णालयात उपचार
अलिबागवरून तळेगाव, मावळ दिशेने ही कार निघाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर महामार्गावरील आपत्कालीन मदत यंत्रणा, महामार्ग पोलिस, खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तसेच क्रेनच्या मदतीने कारवर पडलेला कंटेनर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com