खोपोली पालिका अनधिकृत होल्डिंग वर कारवाई करणार, खोपोली पालिका ॲक्शन मोडवर

खोपोली पालिका अनधिकृत होल्डिंग वर कारवाई करणार, खोपोली पालिका ॲक्शन मोडवर

अनधिकृत होर्डिंगप्रकरणी पालिका ॲक्‍शन मोडवर
खोपोलीत ३३ जणांना नोटिसा; कारवाईचा खर्च वसूल करणार

खोपोली, ता. २३ (बातमीदार) ः मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्‍या होर्डिंग दुर्घटनेनंतर खोपोली नगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील अनधिकृत व असुरक्षित होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याची मोहीम खोपोली पालिकेकडून सुरू करण्यात आली असून होर्डिंगधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
खोपोली शहर व परिसरातील होर्डिंगचे प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत १९, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत दोन, खोपोली एसटी महामंडळ, बस स्थानक १०, रमाधाम वृद्धाश्रम दोन असे एकूण ३३ होर्डिंग अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व होर्डिंगधारकांना खोपोली नगरपरिषदेकडून नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत.
खोपोली शहरात झळकणाऱ्या होर्डिंगचीही पाहणी करण्यात येत आहे, हे होर्डिंग परवानगी घेउन लावले आहे का, त्‍याचा परवान्याची मुदत संपली आहे का, तसेच होर्डिंग लावताना सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली आहे का, त्‍याची रचनात्मक तपासणीचा अहवाल २८ मे २०२४ पर्यंत नगरपरिषद कार्यालयात जमा करावी अशा सूचना संबंधित विभागांना दिल्‍या आहेत. त्‍यानंतर अनधिकृत होर्डिंग नगरपरिषदेकडून हटवण्यात येणार असून त्‍याचा खर्च संबंधित होर्डिंग धारकाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा खोपोली नगर परिषदेकडून देण्यात आला आहे.

सर्वेक्षणात अनधिकृत व असुरक्षित असलेल्या होर्डिंगवर तातडीने कारवाई होणार आहे. होर्डिंगधारकाने किंवा संबंधित प्रतिनिधींनी तसे होर्डिंग तातडीने स्वतःहून काढून टाकण्याच्या नोटिसा बजावल्‍या आहेत. तरीही अनधिकृत होर्डिंग आढळल्यास पालिका प्रशासन, सर्व होर्डिंग काढून टाकले व त्यासाठी येणारा आर्थिक खर्च संबंधित कंपनी किंवा होर्डिंगधारकाकडून वसूल केला जाईल.
- डॉ पंकज पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

.............

खालापूर प्रशासनाकडून मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा

खालापूर, ता. २३ (बातमीदार)ः अतिवृष्‍टीमुळे विस्‍कळित होणाऱ्या जनजीवनाचा तीन ते चार वर्षांपासून सातत्याने अनुभव घेणारे खालापूर तालुका प्रशासन यंदाच्या मॉन्सूनपूर्व तयारीला लागले आहे. तहसीलदार आयुब तांबोळी यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक झाली. यात तालुक्यातील दरडप्रवण, पूरप्रवण धरणक्षेत्र, तलाव, धबधबे या ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला.
तालुक्‍यातील सर्व विभाग प्रमुखांना आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, अधिकारी कर्मचारी यांची मोबाईल नंबरसह अद्ययावत माहिती सादर करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्‍या. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विभाग अधिकाऱ्याची नेमणूक करून, त्याची माहिती तालुका नियंत्रण कक्षात सादर करण्याच्या सूचना केल्‍या आहेत. विभागप्रमुखांनी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, भ्रमणध्वनी कायम सुरू ठेवण्याच्या व तालुक्यात उद्भवण्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीस तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नैसर्गिक आपत्ती उद्‌भवण्याच्या अनुषंगाने खालापूर तहसीलदार कार्यालयात २४x७ तास खालापूर तालुका नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्‍याचा संपर्क क्रमांक ०२१९२-२७५०४८ आहे. कोणतीही आपत्‌ती ओढावल्‍याने नागरिकांना त्‍वरित याठिकाणी संपर्क करावा.
- आयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर

खालापूर ः तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com