उत्पादक संघटनेचा तीनदिवसीय महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्पादक संघटनेचा तीनदिवसीय महोत्सव
उत्पादक संघटनेचा तीनदिवसीय महोत्सव

उत्पादक संघटनेचा तीनदिवसीय महोत्सव

sakal_logo
By

महाड, ता. १९ (बातमीदार) : महाड उत्पादक संघटनेकडून दरवर्षी एम. एम. ए. महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीही संस्थेच्या वतीने २१ ते २३ जानेवारी या दरम्यान या महोत्सवाचे जोरदार आयोजन केले आहे. नांगलवाडी येथील समर्थ रामदास विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
महाड एमआयडीसीमधील कारखानाचालक मालकांकडून चालवल्या जाणाऱ्या महाड उत्पादक संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एम. एम. ए. महोत्सवाचे आयोजन केले आहे. २१ ते २३ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये गायन स्पर्धा, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, संगीत मैफिल, विविध प्रकारचे फनी गेम्स, खाद्य जत्रा यातून लहान थोरांचे मनोरंजन होणार आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून काम करणाऱ्या कामगारांना आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांना या महोत्सवातून आपल्या कलागुणांना वाव देणे शक्य होत असते. २३ जानेवारीला अंशुमन विचारे, अक्षय घाणेकर, ईशानी पाटणकर यांच्या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे. परिसरातील नागरिकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एम. एम. ए.च्या वतीने निखील भोसले यांनी केले आहे.