Sat, April 1, 2023

मटका अड्यावर पोलिसांचा छापा
मटका अड्यावर पोलिसांचा छापा
Published on : 28 February 2023, 12:50 pm
महाड, ता. २८ (बातमीदार) : महाड शहरातील सुकट गल्ली ते दादली पूल जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (ता. २७) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रणजित प्रभाकर नांगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाड शहरातील सुकट गल्ली ते दादली पूल जाणाऱ्या रोडवर निखिल मोहिते (रा. सव) याने विनापरवाना मटका जुगार चालवत होता. त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडून पावती बुक, पेन आणि ६०० रुपये रोख रक्कम जप्त केली. महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत निखिलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार एस. एस. पिंगळे करत आहेत.