Thur, March 30, 2023

महाडमधून महिला बेपत्ता
महाडमधून महिला बेपत्ता
Published on : 28 February 2023, 12:50 pm
महाड (बातमीदार) : महाड शहरातील चवदार तळे या भागातून ४२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही महिला रविवारी (ता. २६) सकाळी १० च्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेली. ती अद्याप परतली नाही. महाड शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार स्वरूपा कांतीलाल गांधी असे या हरवलेल्या महिलेचे नाव आहे. त्या मयुरेश बिल्डिंग, दुसरा मजला, चवदार तळे या ठिकाणी राहत होत्या. या घटनेची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली.