टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

महाड, ता. १४ (बातमीदार) ः रसायनाची वाहतूक करणाऱ्या एका टँकरने तरुणाला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहराजवळील गांधारपाले गावच्या हद्दीत मंगळवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काही काळ रस्त्यावर उतरून वाहतूक बंद केली होती. प्रेम लक्ष्मण पवार (वय २२) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

रसायन वाहून नेणारा टँकर पोलादपूरहून मुंबईच्या दिशेने जात होता. गांधारपाले गावच्या हद्दीतून जाणाऱ्या या टँकरने रस्ता ओलांडणाऱ्या प्रेम पवार याला जोराची धडक दिली व चिरडले. श्री काळकादेवी मंदिरासमोर काम चालू असलेल्या ठिकाणी हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. अपघात झाल्यानंतर टँकरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. बालकृष्ण झुलाई असे या चालकाचे नाव आहे.
अपघाताच्या घटनेनंतर गांधारपाले ग्रामस्थांनी काही काळ रस्त्यावर उतरून वाहतूक बंद केली होती. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीने या रस्त्यावर वाहतूक बंद असल्याचे फलक अथवा बॅरिकेट्स लावले नसल्याने हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या वेळी पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा अधिक तपास महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com