सागरी सुरक्षा दलाकडून आपत्ती व्यवस्थापनाची चाचपणी

सागरी सुरक्षा दलाकडून आपत्ती व्यवस्थापनाची चाचपणी

मदत कार्यातील बोटींची चाचपणी
सागरी सुरक्षा दलाकडून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन

महाड, ता. ३१ (बातमीदार) : महाड शहर व सावित्री नदीकिनारी असणाऱ्या गावांना पावसाळ्यात नेहमीच पुराचा तडाखा सहन करावा लागतो. नदीची पातळी वाढली की अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. अशा वेळी मदतकार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्या व पूर ठिकाणांची पाहणी सागरी सुरक्षा दलाकडून करण्यात आली.
महाड शहरातील भोईघाट या ठिकाणाहून सागरी सुरक्षा दलातील अधिकारी रूपेश भोईर, मनोज मिश्रा, संजय पाटील, रणजित साळवे तसेच नगरपालिकेचे कर्मचारी यांनी मदतकार्यासाठी वापरलेल्या होडीतून सावित्री नदीत फेरफटका मारला. यावेळी तहसीलदार महेश शितोळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, आपत्ती विभाग प्रमुख गणेश पाटील, अभियंता रोहित भोईर उपस्थित होते. सागरी सुरक्षा दलाकडून प्रथम होड्यांची चाचपणी करण्यात आली. मदतकार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्या योग्य प्रकारे कार्यान्वित आहेत की नाही याची तपासणीही करण्यात आली. सावित्री नदीतून या होड्या फिरविण्यात आल्या.
पूर आल्यानंतर नदीकिनारी असणाऱ्या गावांना मदत करण्यासाठी नदीच्या मोठ्या प्रवाहातून होड्या चालवाव्या लागतात. अशा वेळी नदीकिनारी असणारी गावे तसेच पूर परिस्थिती वेळी निर्माण होणारी अडचणी याबाबत आढावाही घेण्यात आला व प्रत्यक्ष ठिकाणांची पाहणीही करण्यात आली. आपत्ती आल्यानंतर धावपळ करण्यापूर्वीच योग्य नियोजन करण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याने एनडीआरएफच्या पथकाप्रमाणेच सागरी सुरक्षा दलही आता क्रियाशील झाले आहे.

महाड ः सावित्री नदीत होडीतून चाचपणी करण्यात आली.

.................

पूरस्थितीवर मात करण्यासाठी दोन बोटी
पोलादपूर (बातमीदार) ः तालुक्यातील अतिवृष्‍टीचे प्रमाण लक्षात घेता उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या वतीने दोन बोट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील सवाद, माटवण तसेच सावित्री नदीकिनार असलेल्या गावांना अतिवृष्‍टीत पुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बोटीद्वारे नागरिकांची सुरक्षित स्‍थळी स्थलांतरित करण्यात बोटींमुळे मदत होणार आहे.
पोलादपूर तालुका प्रशासनामार्फत बोटी उपलब्ध करून देण्यात आल्याने काळ भैरवनाथ बचाव पथकाचे अध्यक्ष दीपक उतेकर व सदस्य सुमीत दरेकर, दिनेश दरेकर आदींनी बोटींची पाहणी केली. यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे, आपत्तीचे निवारण कक्षाचे परशुराम पाटील, आबासाहेब जगताप आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com