डॉ. अनिल धारप यांना आरोग्यम् धनसंपदा पुरस्कार प्रदान

डॉ. अनिल धारप यांना आरोग्यम् धनसंपदा पुरस्कार प्रदान

महाड, ता. ९ (बातमीदार) : चाळीस वर्षांपासून सेवा देत असलेल्या महाड येथील डॉ. अनिल त्रिंबक धारप यांचा इन मेजर सिटी नवी मुंबई या संस्थेतर्फे आरोग्यम् धनसंपदा हा पुरस्कार देऊन सत्‍कार करण्यात आला.
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नवी मुंबई मराठी साहित्य मंदिर ऑडिटोरियम येथे आयोजित विशेष कार्यक्रमात रायगडसह नवी मुंबईतील ३९ व्यावसायिक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉ अनिल धारप प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून विन्हेरे व दासगाव या ठिकाणी एकूण सहा वर्षे काम पाहिले होते. १९८४ नंतर त्यांनी खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. रायगड मेडिकल असोसिएशनचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे तत्कालीन सचिव व विद्यमान महाड शाखेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. महाडमधील रोटरी क्लबशी अनेक दशकांपासून ते संबंधित असून शहरात घंटागाडीचा उपक्रम धारप यांच्याच सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. क्षय रोग निर्मूलनासाठी एक खिडकी योजना, पोलिओ लसीकरण त्याचबरोबर आठवड्यातून एक दिवस गरीब व गरजू नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा मोफत देण्याचा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे राबवला आहे

महाड ः डॉक्टर अनिल धारप यांना पुरस्‍कार देऊन गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com