परतीच्या प्रवासासाठी लालपरीचा आधार

परतीच्या प्रवासासाठी लालपरीचा आधार
Published on

परतीच्या प्रवासासाठी लाल परीचा आधार

महाड, ता. १५ (बातमीदार) : कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांना परतीच्या प्रवासासाठी लाल परीचा मोठा आधार मिळाला आहे. महाड बस स्थानकातून आतापर्यंत तब्बल वीस हजारांहून अधिक गणेशभक्त परतीच्या प्रवासासाठी रवाना झाले आहेत. कोकणामध्ये तब्बल अडीच लाख गणेशभक्तांनी एसटी प्रवासाचा फायदा घेतला आहे.
कोकणात प्रामुख्याने गणेशोत्सव व होळीच्या सणासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने दाखल होतात. त्‍यासाठी कोकण रेल्वेकडून जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असली तरीही काही तासांतच आरक्षण फुल होते. एसटी बस, तसेच मिळेल त्या वाहनाने चाकरमानी गावी आले आहेत. आता गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर भक्‍तांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या गाव-पाड्यांतून तालुक्याच्या ठिकाणी येण्याकरिता तसेच मुख्य ठिकाणाहून मुंबई, ठाणे, नालासोपारा, वसई अशा ठिकाणी परतीच्या प्रवासाकरिता बस स्थानके गर्दीने गजबजली आहेत.
महाड बस स्थानकातून आतापर्यंत तब्बल १४० जादा गाड्या मुंबई, पनवेल या ठिकाणी रवाना झाल्‍या असून वीस हजारांहून अधिक गणेशभक्तांनी परतीच्या प्रवासाचा लाभ घेतला आहे. अजूनही सुटीचे काही दिवस असल्याने पुढील तीन दिवस लाल परी गणेशभक्तांच्या प्रवासासाठी सज्ज राहणार आहे.

महाड, पोलादपूर तसेच आंबेत बस स्थानकातून जादा गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे. महाड बस स्थानकामध्ये बस लागताच जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडत आहे. कोकणातून परतणारे गणेशभक्त परतीचा प्रवास एसटीने करत असून महाड बस स्थानकातून जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- शिवाजी जाधव, प्रभारी आगार व्यवस्थापक, महाड

महाड ः स्थानकावर बस पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com