रायगड जिल्ह्याच्या गतवैभवाला बळकटी
रायगड जिल्ह्याच्या गतवैभवाला बळकटी
केंद्राच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत समावेश
महाड, ता.३० ः औद्योगिकीकरणाच्या जोडीला कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवली आहे. या योजनेतील समावेशामुळे रायगड जिल्ह्याचा भाताचे कोठार म्हणून असलेला गतवैभवाला बळकटी मिळणार आहे.
रायगड जिल्ह्याच्या उत्तरेत पनवेल, उरण, जेएनपीटीसारखे औद्योगिक प्रकल्प उभे राहिले आहेत. मात्र, महाड, श्रीवर्धन, खालापूर आणि कर्जत तालुक्यात शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना योजनेचा विशेष लाभ होईल, असा विश्वास असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. शेतमालाच्या विक्रीत अडचणी येऊ नयेत म्हणून जिल्ह्यात नवी धान्य गोदामे उभारली जाणार आहेत. सहकारी संस्था व बँकांच्या माध्यमातून शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा होणार आहे. तसेच जिल्ह्यातील भात, रब्बीपिके, भाजीपाला, फळबाग लागवडीला चालना मिळणार आहे.
--------------------------------
१०० जिल्ह्यांची निवड
या योजनेच्या निवडीसाठी कमी उत्पादन, कमी लागवड क्षेत्र आणि अपुऱ्या कृषी पतपुरवठ्याचे प्रमाण निकष होते. त्यानुसार रायगडसह देशातील १०० जिल्हे निवडण्यात आले असून अल्पभूधारक तसेच गोरगरिब शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.