महाडमध्ये वाहतूक कोंडीची समस्या

महाडमध्ये वाहतूक कोंडीची समस्या

Published on

महाडमध्ये वाहतूक कोंडीची समस्या
नो पार्कींग झोनचा बोजवारा; आराखडा तयार करूनही अंमलबजावणी नाही
महाड, ता. ७ (बातमीदार) : शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरपालिकेने तयार केलेला वाहतूक आराखडा सध्या बासनात पडला आहे. नो पार्कींग झोनचा बोजवारा, फेरीवाल्यांचा उच्छाद, शहरातील प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी यामुळे महाडमधील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. महाड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणारी एक मुख्य समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.
वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे महाडमध्ये वाहनांची संख्याही वाढत आहे. प्रमुख व्यापाराचे ठिकाण, तालुक्याचे ठिकाण व महामार्गावरील शहर असल्याने अहोरात्र येथे वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहतूक व्यवस्थेचे नियोजन नसल्याने बेशिस्त वाहनचालकांची शहरात कमतरता नसल्याचे दिसून येत आहे. महाड शहरातील बाजारपेठ जूनी आहे. तसेच काही रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असते. परंतु उर्वरीत ठिकाणी पालिकेने रस्ते रूंद करूनही ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. त्यामुळे वाहतूक समस्या जैसे थे आहे. या वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी महाड नगरपालिकेने वाहतूक आराखडा पालिका सभेत २०१९ ला मंजूर करून घेतला. त्यानुसार या आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मंजूरी दिली होती. त्यानुसार शहरात एक दिशा मार्ग, सम विषम पार्किंग व्यवस्था, महत्त्वाच्या ठिकाणे नो पार्किंग झोन, शिवाजी चौकात पार्किंग डेपो, अवजड वाहनांसाठी वेळ निश्चित असे, अनेक उपाय संबंधित आराखड्यात आहेत. त्यानुसार पालिकेने शहरात नो पार्किंग झोन तयार करून नामफलकही लावले आहेत. परंतु काही दिवसानंतर मात्र पोलिस यंत्रणा व नगरपालिका थंडावली आहे. सद्यस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा बाजार झाला आहे. भगवानदास बेकरी परिसराला भाजी विक्रेत्यांचा विळखा आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाड ट्रेड सेंटर, नवी पेठ कॉर्नर, चवदार तळे आदी परिसरात वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. यावरही फारशी कारवाई झालेली नाही. चौकातील वाहनतळही बंद झाल्याने वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे महाडकरांची ही समस्या आजही कायम आहे.
........................................
वाहतूक कोंडीची ठिकाणे
छ. शिवाजी महाराज चौक, बँक ऑफ इंडिया नवीन कार्यालय, एचडीएफसी बँके, लायन्स क्लब काँर्नर,भगवानदास बेकरी परिसर,एस .टी. स्टँड, चवदार तळे, जिजामाता उद्यान,बाजारपेठ महात्मा गांधी मार्ग
.....
अशी आहे वाहतूक व्यवस्था
सम-विषम पार्किंग व्यवस्था - साळीवाडा नाका ते प्रांत कार्यालय
एकेरी मार्ग - म. गांधी मार्ग बाजारपेठ
..........
नो पार्किंग झोन
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पूर्ण सर्कल
छत्रपती शिवाजी चौक ते भगवानदास बेकरी पर्यत रस्ता
चवदार तळे ते पश्चिम बाजुकडील रस्ता
चवदार तळे ते दक्षिण बाजुकडील रस्ता
डोंगरी पूल ते म.गांधी मार्ग

असा आराखडा तयार करूनही तशा प्रकारची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही
.........................
फोटो- अशाप्रकारे वाहन उभे केले जातात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com