बौद्ध विहारात तोडफोड; दोघांविरोधात गुन्हा दाखल.

बौद्ध विहारात तोडफोड; दोघांविरोधात गुन्हा दाखल.
Published on

बौद्ध विहारात तोडफोड
दोघांविरोधात गुन्हा दाखल
महाड, ता. १२ (बातमीदार) : महाड तालुक्यातील कोळोसे येथील बौद्ध विहारात तोडफोड करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोघांविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
कोळोसे येथील बौद्ध विहारात शुक्रवारी (ता. १०) दुपारच्या वेळेत ही घटना घडली. याबाबत सुरक्षा रक्षक असलेले सुरेश गायकवाड (वय ५३) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार मच्छिंद्र गाडकर व रमेश जाधव (दोघेही रा. तळोशी) यांना बौद्ध विहारासमोर दारू पिण्यास मनाई केली असता राग आला. त्यानंतर संगनमताने त्यांनी विहारात घुसून तोडफोड केली आहे. या घटनेत विहाराच्या खिडक्या, लाइट मीटर आणि ग्रीलचे नुकसान झाले आहे. याशिवाय संबंधित बॅनरवर दगडफेक करून त्याची विटंबना करण्यात आली असून, ध्वजस्तंभ काढून तोडफोड केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात धार्मिक भावना भडकावणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी बाबींनुसार कारवाई करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com