Mon, Jan 30, 2023

गोवरच्या तीन नव्या रुग्णांची नोंद
गोवरच्या तीन नव्या रुग्णांची नोंद
Published on : 3 January 2023, 4:02 am
मुंबई, ता. ३ : मुंबईत ऑक्टोबर महिन्यापासून गोवरबाधित रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मंगळवारी दिवसभरात तीन नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ५५२ वर पोहोचली आहे. दरम्यान, गोवरमुळे आतापर्यंत १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत ७६ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला असून ३७१ प्रभागात गोवरचा फैलाव झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळले आहेत.
मंगळवारी दिवसभरात २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.