जोगेंद्र कवाडेंची शिंदे गटासोबत युती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेंद्र कवाडेंची शिंदे गटासोबत युती
जोगेंद्र कवाडेंची शिंदे गटासोबत युती

जोगेंद्र कवाडेंची शिंदे गटासोबत युती

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत (शिंदे गट) युतीची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित होऊन त्यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचे कवाडे यांनी आज बाळासाहेब भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवाडे यांचे आणि त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की पीआरपी आणि आम्ही संघर्षातून पुढे आलो आहे. आमचा संघर्ष कठीण होता. कवाडे हे लाँग मार्च करणारे नेते होते. त्यांचा लाँग मार्च आज योग्य जागेवर आला आहे. त्यामुळे आम्ही सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रा. कवाडे म्हणाले, आम्ही देण्याघेण्यासाठी आलो नाही, तर विचारांना प्रेरित होऊन आलो; मात्र मुंबईत ज्या जागा मिळतील, त्यावर आम्ही समाधान मानू. शिंदे यांच्या माध्यमातून लोकांना आश्र्वस्त करणारे हे नेतृत्व महाराष्ट्राला प्राप्त झाले. त्यामुळे आम्ही ही आघाडी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही राज्यात पाच विभागांत जाहीर सभा घेणार आहोत.
----
ठाकरेंवर आरोप!
नागपूर येथील अंबाझरी उद्यानात बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात २० एकर जागा पर्यटन विभागाला दिली. ते उद्यान बुलडोझर लावून उद्धस्त केले. त्याला मागील सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. त्या वेळी आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऐकले नसल्याचा दावा करत कवाडे यांनी त्यांच्यावर आरोप केले.