बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम
बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम

बदलत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : बुधवारी मुंबईतील किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेली थंडी मुंबईत जोर धरत आहे. मात्र, अशा वातावरणामुळे मुंबईकरांमध्ये विषाणूजन्य आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहेत. मुंबई महापालिकेच्या उपनगरीय प्रमुख डॉक्टरांनी १० टक्के सर्दी-खोकल्याचे रुग्ण येत असल्याचा दुजोरा दिला. मात्र, त्याचा त्रास कोविडप्रमाणे नसल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, तापमानातील चढ-उताराचा त्रास मुंबईकरांच्या आरोग्यावर होत असून विषाणूजन्य संसर्गातून खोकला-सर्दी वाढत आहे. त्यात तापाचे रुग्णही आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. विषाणूजन्य आणि वातावरणातील चढ-उताराचा त्रास वाढत असल्याचे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून संसर्गजन्य तापाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. त्यात सर्दी आणि खोकला अशी प्रमुख लक्षणे वाढत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये १० ते १५ टक्के रुग्ण येत असल्याचे खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

सध्याच्या विषाणूजन्य आरोग्य तक्रारींमध्ये जोखमीचे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. लसीकरण करून घ्या, मास्क वापरा आणि डॉक्टरांची त्वरित भेट घेऊन आपल्या आजाराविषयी त्यांना कल्पना द्या. कोविडला सरावले असला तरीदेखील स्वतःहून उपचार करु नका, असेही आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

सर्दी-खोकल्याचा १० ते १५ टक्के त्रास मुंबईकरांना जाणवत आहे. मात्र तो आजार कोविडसारखा नसून १० टक्के विषाणूजन्य त्रास सुरू झाला आहे. ओपीडीमध्ये १० टक्के सर्दी-खोकल्याचे रुग्ण येत आहेत.
- डॉ. प्रशांत मोरे, वैद्यकीय अधीक्षक, व्ही. एन. देसाई रुग्णालय