सेंट जोसेफमध्ये आजपासून विज्ञान प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जोसेफमध्ये आजपासून विज्ञान प्रदर्शन
सेंट जोसेफमध्ये आजपासून विज्ञान प्रदर्शन

सेंट जोसेफमध्ये आजपासून विज्ञान प्रदर्शन

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विचार रुजावेत त्यासाठीच्या विविध संकल्पना स्पष्ट व्हाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून उपक्रम राबवण्यात येतात. याच पार्श्वभूमीवर शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एल वॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे सोमवारी (ता. ९) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन ११ जानेवारीपर्यंत चालेल. या प्रदर्शनाला पहिल्या दिवशी ऑगसीलरी बिशप ऑफ मुंबईचे रेव्ह. बिशप बारथोल बरेटे, मराठी विज्ञान परिषदेचे अनंत देशपांडे, सेंट जोसेफ हायस्कूलचे फादर संतोष साळवे, शिक्षण निरीक्षक ऊर्मिला पारधी, उपनिरीक्षक पूजा चव्हाण, सह शिक्षण उपनिरीक्षक अनिल गावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ११ जानेवारी रोजी बालवैज्ञानिक आणि शिक्षक यांच्या संशोधन निर्मितीस प्रोत्साहन देणाऱ्या विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रतिकृती सादर करणाऱ्या बालवैज्ञानिकांचा गौरव केला जाणार असून त्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. हा कार्यक्रम शिक्षक आमदार कपिल पाटील, वैज्ञानिक डॉ. संजय जांभुळकर, वैज्ञानिक नरेंद्र देशमुख आदींच्या मुख्य उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि खेळणी हा मुख्य विषय देण्यात आला असून त्यासोबत विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध विषयांवरील माहिती मिळावी यासाठी होमी भाभा केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. संतोष टकले यांचे अंडरस्टँडिंग इकोसिस्टम फॉर हेल्थ ॲण्ड हायजिन या विषयावर परिसंवादही ऐकायला मिळणार असल्याचे सांगण्यात आले.