डिंपल पब्लिकेशनच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डिंपल पब्लिकेशनच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
डिंपल पब्लिकेशनच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

डिंपल पब्लिकेशनच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

sakal_logo
By

‘कवितांच्या गावा जावे’ आणि ‘विजनातील अंधुक काळोख’चे प्रकाशन
मुंबई, ता. १० : मुंबईतील डिंपल पब्लिकेशन २६ जानेवारी रोजी ४९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर कवी अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, सौमित्र आणि महेश केळुसकर यांच्या ‘कवितांच्या गावा जावे’ या गाजलेल्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी (ता. १५) मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या वेळी के. जे. सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालयांच्या प्रभारी प्राचार्या डॉ. वीणा सानेकर, अश्विनी भोईर, कवी संकेत म्हात्रे, आदित्य दवणे, प्रथमेश पाठक, गीतेश शिंदे, संदीप राऊत, संजय शिंदे, वृषाली विनायक आदी उपस्थित राहणार आहेत.
डिंपल पब्लिकेशनतर्फे सतीश सोळांकुरकर यांच्या ‘विजनातील अंधुक काळोख’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन शनिवारी (ता. १४) कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, के. जे. सोमय्या कला वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार येथे सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या वेळी ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, प्रसिद्ध कलावंत सागर तळाशीकर इत्यादींची विशेष उपस्थिती असेल, अशी माहिती डिंपल पब्लिकेशनचे प्रमुख अशोक मुळे यांनी दिली.