केईएम, सायन रुग्णालयात रोबोटिक आर्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केईएम, सायन रुग्णालयात रोबोटिक आर्म
केईएम, सायन रुग्णालयात रोबोटिक आर्म

केईएम, सायन रुग्णालयात रोबोटिक आर्म

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णालयांमध्ये हायटेक शस्त्रक्रिया प्रणालींमधील रोबोटिक आर्म खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. यातून तीन रोबोटिक आर्म खरेदी करण्याची शक्यता असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. यातून एक केईएम रुग्णालयात; तर दोन सायन रुग्णालयांसाठी ठेवण्यात येतील असेही ते म्हणाले.
रोबोटिक आर्म्स मागवण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या आधुनिक प्रणालीचा डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी फायदा होणार असून रुग्णांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या प्रणालीतून तंतोतंत सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया सुनिश्चित करण्याचे ठरवण्यात येईल. खासगी रुग्णालयांमधील ऑपरेशन थिएटरमध्ये आधीपासूनच रोबोटिक आर्म्सचा वापर सुरू आहे. प्रोस्टेट ग्रंथी, युरो-कॅन्सर, पित्त मूत्राशय आणि ईएनटी भागातील शस्त्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक आर्म वापरला जातो. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अणुऊर्जेद्वारे चालवले जाणारे कॅन्सर केअर हब विभागात रोबोटिक आर्म्स शस्त्रक्रिया केल्या जातात. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी वापरात येणाऱ्या या नवीन रोबोटिक आर्म पद्धतीमुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होत आहेत तसेच रुग्णाचे रक्त कमी प्रमाणात वाया जाते. शिवाय या पद्धतीमुळे कमी वेळ लागत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पालिकेने अद्याप रोबोटिक आर्म सहाय्यित शस्त्रक्रियांच्या किमतीवर निर्णय घेतलेला नाही. खासगी रुग्णालयांत अशा पद्धतीच्या शस्त्रक्रियांकरिता एक लाख ते सव्वा लाख रुपये लागत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च येतो; मात्र रोबोटिक आर्म पद्धत वापरल्याने यात आणखी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च वाढू शकतो, असा अंदाज खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ व्यक्त करतात.
...
डॉक्टरांना दिलासा
१० वर्षांपूर्वी रोबोटिक आर्म ओटी विभागात वापरण्यास सुरुवात झाली. तसेच कोणत्याही शस्त्रक्रिया डॉक्टर दीर्घकाळ उभे राहून करत असतात. तसेच डॉक्टरांना शस्त्रक्रिया साहित्य उचलत राहण्यासारख्या हालचाली कराव्या लागतात. यातून डॉक्टरांचे खांदे, टाच, कोपर आणि पाठीभोवती समस्या निर्माण होतात; मात्र रोबोटिक आर्म्स आल्याने डॉक्टरांच्या हालचाली थांबून उद्भवणाऱ्या समस्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.
...