दाऊदला मदत केल्याप्रकरणी उद्योजक जोशींसह तिघांना शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाऊदला मदत केल्याप्रकरणी
उद्योजक जोशींसह तिघांना शिक्षा
दाऊदला मदत केल्याप्रकरणी उद्योजक जोशींसह तिघांना शिक्षा

दाऊदला मदत केल्याप्रकरणी उद्योजक जोशींसह तिघांना शिक्षा

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : पाकिस्तानमध्ये गुटख्याचे उत्पादन करण्यासाठी गँगस्टर दाऊद इब्राहिमला मदत केल्याच्या आरोपात सोमवारी मुंबई विशेष सत्र न्यायालयाने उद्योजक जे. एम. जोशी यांच्यासह अन्य दोघांना दोषी ठरवून दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
जोशीसह जमिरुद्दिन अन्सारी आणि फारुख मन्सुरी यांना न्या. बी. डी. शेळके यांनी मोक्का आणि भादंवि कायद्याच्या तरतुदीनुसार दोषी ठरविले आहे. कराचीमध्ये गुटख्याचे उत्पादन सुरू करण्यासाठी दाऊद आणि त्याच्या साथीदारांना जोशी यांनी मदत केल्याचा आरोप होता. गुटखा उत्पादक रसिकलाल धारीवाल आणि जोशी यांच्यातील व्यावसायिक मतभेद मिटवण्यासाठी दाऊदने मध्यस्थी केली होती. याबदल्यात त्यांना कराचीमध्ये सन २००२ मध्ये गुटखा उत्पादन सुरू करण्याचा व्यवहार ठरला होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी धारीवाल हेदेखील आरोपी होते; मात्र खटल्यादरम्यान धारीवाल यांचा मृत्यू झाला. दाऊद यामध्ये फरारी आरोपी आहे.