इमारत बांधकामासाठी ‘मियावाकी’ बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत बांधकामासाठी ‘मियावाकी’ बंधनकारक
इमारत बांधकामासाठी ‘मियावाकी’ बंधनकारक

इमारत बांधकामासाठी ‘मियावाकी’ बंधनकारक

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : महापालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील काही भागांत मियावाकी वन विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. भूखंडावरील खुल्या क्षेत्राच्या जागेपैकी पाच टक्के जागा मियावाकी वनांसाठी राखीव ठेवावी लागणार असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
मुंबई महापालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही ‘खुले क्षेत्र’ असणे बंधनकारक आहे. त्यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या पाच टक्के इतक्या आकारात मियावाकी वन विकसित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर वन विकसित करण्यासाठी संबंधित विकासकाला काही तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास त्याची माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला बांधकाम परवानगीविषयक अटींमध्ये मियावाकी वन विकसित करण्याच्या अटींचा समावेश करण्याचे निर्देशही आयुक्तांच्या आदेशानुसार देण्यात आले आहेत, असेही परदेशी यांनी कळवले आहे.
.......
मियावाकीची वैशिष्ट्ये
१. सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात.
२. साधारणतः दोन वर्षांत विकसित होणाऱ्या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.
३. सुरुवातीची दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरीत्या वाढतात.