जेईई मुख्य परीक्षा नियोजित वेळेनुसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेईई मुख्य परीक्षा नियोजित वेळेनुसार
जेईई मुख्य परीक्षा नियोजित वेळेनुसार

जेईई मुख्य परीक्षा नियोजित वेळेनुसार

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशासाठी जानेवारी महिन्यात होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा पुढे घेण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने आज अमान्य केली. यामुळे नियोजित वेळेनुसार परीक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभारी मुख्य न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे आज यावर सुनावणी झाली. परीक्षा पुढे ढकलण्याचे दुहेरी परिणाम होऊ शकतात. सध्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. आजच्या सुनावणीमध्ये केवळ परीक्षा पुढे घेण्यावर सुनावणी झाली. याचिकेत ७५ टक्के गुणांना दिलेल्या आव्हानावर अद्याप सुनावणी बाकी आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला निश्चित केली आहे.
जानेवारीत होणारी जेईई परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यासाठी आणि ७५ टक्के गुणांची शर्त शिथिल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते अनुभा सहाय यांनी न्यायालयात केली आहे. केंद्रीय परीक्षा संस्थेने १५ डिसेंबरला काढलेल्या यासंबंधीच्या अधिसूचनेला ॲड. सहाय यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. ही परीक्षा २४ ते ३१ यादरम्यान होणार आहे; मात्र ती पुढे एप्रिलमध्ये घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
...
आयआयटी प्रवेशासाठीचा निकष
आयआयटीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ७५ टक्के गुणांचा निकष ठेवण्यात आला आहे. यालादेखील याचिकेत विरोध करण्यात आला आहे. ७५ टक्के गुण हा निकष किमान उत्तीर्ण गुण असा असावा. यापूर्वी ७५ टक्के हा निकष नव्हता. या बदललेल्या निकषामुळे मुलांना सामील होणे अवघड होऊ शकते, असेही यामध्ये म्हटले आहे; मात्र ही याचिका दिशाभूल करणारी आहे, असा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.