Wed, Feb 8, 2023

एसएनडीटीच्या सिनेट सदस्यपदी
किशोर रिठे यांची निवड
एसएनडीटीच्या सिनेट सदस्यपदी किशोर रिठे यांची निवड
Published on : 12 January 2023, 11:47 am
मुंबई, ता. १२ : तीन दशकांपासून वन्यजीव आणि वनसंरक्षण क्षेत्रात काम करणारे तसेच अनेक शासकीय योजना आणि धोरणे ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या किशोर रिठे यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एसएनडीटी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्ती केली. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. रिठे यांनी यापूर्वी केंद्रीय वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, तसेच महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळावरही सदस्य म्हणून काम केले आहे. ते सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव म्हणून काम पाहत आहेत.