दुधगांवकर पुरस्काराचे आज मुंबईत वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुधगांवकर पुरस्काराचे आज मुंबईत वितरण
दुधगांवकर पुरस्काराचे आज मुंबईत वितरण

दुधगांवकर पुरस्काराचे आज मुंबईत वितरण

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : परभणीच्या शिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ‘रूपाली दुधगावकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कारा’चे गुरुवारी (ता. १२) मुंबईत पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ५ वाजता वितरण होणार आहे. २०२२ चा ‘रूपाली दुधगावकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव आणि कवयित्री व चित्रकार डॉ. मीनाक्षी पाटील यांना नुकताच जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पॉप्युलर प्रकाशनचे प्रकाशक रामदास भटकळ, माजी खासदार ॲड. गणेशराव दुधगावकर, परभणीच्या ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. संध्या दुधगावकर, समीर दुधगावकर, प्रोफेसर डॉ. श्रीधर भोंबे, प्रोफेसर डॉ. विलास पाटील आणि संपादक-लेखक संदीप काळे उपस्थित राहणार आहेत.