बाल न्याय कायद्यातील दुरुस्तीला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल न्याय कायद्यातील दुरुस्तीला स्थगिती
बाल न्याय कायद्यातील दुरुस्तीला स्थगिती

बाल न्याय कायद्यातील दुरुस्तीला स्थगिती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १२ : दत्तक प्रक्रियेशी संबंधित प्रलंबित प्रकरणे दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्याच्या बाल न्याय अधिनियम कायद्यातील दुरुस्तीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. संबंधित प्रकरणे उच्च न्यायालयात एकल न्यायाधीशांपुढे वर्ग करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दत्तक प्रक्रिया अवंलबणाऱ्या दोन पालकांनी उच्च न्यायालयात बाल न्याय अधिनियम कायद्यातील संबंधित नवीन सुधारणेला उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या दुरुस्तीनुसार संबंधित प्रकरणे न्यायालयांऐवजी दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्व देशी आणि परदेशी दत्तक प्रक्रिया दंडाधिकारी न्यायालयात केली जाणार आहे. याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने एटर्नी जनरलना नोटीस बजावली आहे. याचिकेवर चार आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे.