चेंबूर-गोवंडी होणार चकाचक : स्वच्छतेसाठी संस्थांची नियुक्ती ; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबूर-गोवंडी होणार चकाचक :  स्वच्छतेसाठी संस्थांची नियुक्ती ;
चेंबूर-गोवंडी होणार चकाचक : स्वच्छतेसाठी संस्थांची नियुक्ती ;

चेंबूर-गोवंडी होणार चकाचक : स्वच्छतेसाठी संस्थांची नियुक्ती ;

sakal_logo
By

चेंबूर-गोवंडी होणार चकाचक
स्वच्छतेसाठी संस्थांची नियुक्ती

मुंबई उपनगरातील चेंबूर व गोवंडी परिसर चकाचक करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. परिसर नियमित स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेतर्फे काही संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या साफसफाईसह आजूबाजूचा परिसरही स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.

मुंबईच्या स्वच्छतेसाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विभागनिहाय स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने सामाजिक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत. अर्जांची छाननी सुरू असून पात्र संस्थांची महिनाभरात नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून त्यांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
सुशोभीकरणाच्या कामामध्ये रस्ते आणि परिसराच्या स्वच्छतेवरही भर देण्यात येत आहे. शहर व उपनगरांतील रस्ते व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखली जाते; मात्र उपनगरांतील अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा दिसून येतो. त्यासाठी आता पालिकेच्या विभागनिहाय विविध सामाजिक संस्थांची स्वच्छतेसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या त्या विभागाच्या कार्यक्षेत्रात नोंदणीकृत असणाऱ्या इच्छुक स्थानिक नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था, अशासकीय संस्था आणि औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.
पालिकेच्या अन्य विभाग कार्यालयांच्या हद्दीत रस्ते व परिसराच्या साफसफाईसाठी विविध संस्थांकडून अर्ज मागवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले. अंतिम मंजुरीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात
सर्वप्रथम उपनगरातील चेंबूर आणि गोवंडी परिसरातील स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी विविध संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले असून त्याची अंतिम तारीख १९ जानेवारी आहे. स्वच्छतेसाठी गोवंडी एम-पूर्व भागात ५ आणि चेंबूर एम-पश्चिम परिसरात १९ संस्थांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महिनाभरात संस्थांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाला सुरुवात होईल.

.........