विद्यापीठात आज ‘फकिरा’वर राष्ट्रीय चर्चासत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात आज ‘फकिरा’वर राष्ट्रीय चर्चासत्र
विद्यापीठात आज ‘फकिरा’वर राष्ट्रीय चर्चासत्र

विद्यापीठात आज ‘फकिरा’वर राष्ट्रीय चर्चासत्र

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरोशियन स्टडीज विभागातर्फे सोमवारी (ता. १६) सकाळी ११:३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जगप्रसिद्ध आणि इंग्रजी अनुवादित ‘फकिरा’ कादंबरीवर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील सेंटर फॉर सेंट्रल युरोशियन स्टडी विभागात हे चर्चासत्र होणार असून त्यात ‘फकिरा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी पैलू’ या विषयावर चर्चा होईल. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी सरगर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ. सोनू सैनी हे आपले विचार मांडतील. मूळ मराठी ‘फकिरा’ या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद डॉ. बळीराम गायकवाड यांनी केला असून त्यांचे पेंग्विन प्रकाशनाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशन केले होते.