मांजामुळे शेकडो पक्षी जखमी मांजामुळे शेकडो पक्षी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजामुळे शेकडो पक्षी जखमी
मांजामुळे शेकडो पक्षी जखमी
मांजामुळे शेकडो पक्षी जखमी मांजामुळे शेकडो पक्षी जखमी

मांजामुळे शेकडो पक्षी जखमी मांजामुळे शेकडो पक्षी जखमी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : रंगीबेरंगी पतंग उडवत मकर संक्रांत सण साजरा केला जातो; मात्र यासाठी बंदी असलेला धारदार मांजा वापरला जात असल्याने पक्षी जखमी होतात. शहरात गेल्या चार दिवसांत मांजामुळे १०० पेक्षा अधिक पक्षी जखमी झाल्याची माहिती प्राणिमित्र संघटनांनी दिली.
तरुणांमध्ये पतंगबाजीची मोठी क्रेझ आहे. पतंगबाजीसाठी नायलॉन तसेच धार असणाऱ्या मांजावर बंदी आहे. असे असले तरी एकमेकांच्या पतंगाची कन्नी कापण्यासाठी धारदार मांजा वापरला जातो. त्यामुळे या मांजात अडकून अनेक पक्षी जखमी होतात. यंदा पतंगबाजीचे प्रमाण कमी झालेले असले, तरी १०० पेक्षा अधिक पक्षी जखमी अवस्थेत सापडले आहेत. या पक्ष्यांपैकी ५७ पक्ष्यांवर बैलघोडा रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले; तर गंभीर जखमी झालेल्या सात पक्ष्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती परळ येथील बैलघोडा रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. मयूर डंगर यांनी दिली.
मांजामुळे जखमी झालेल्या १०० पैकी किरकोळ जखमी झालेल्या ५७ क्ष्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. जखमी असलेल्या पक्ष्यांत ६१ कबूतरे, दोन कोकीळ आणि एका घारीचा समावेश आहे. काही प्राणीमित्र संघटनांकडूनदेखील जखमी पक्ष्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
...
दोन वर्षांत प्रमाणात वाढ!
मकर संक्रांतीपूर्वीच पतंगबाजी करणाऱ्यांना प्राणिमित्र संस्था, संघटना आणि प्राणीप्रेमींकडून पतंगबाजी करताना पक्ष्यांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत मांजात अडकून पंखाला जखम होणे, मान कापली जाणे, पायाला इजा होण्यासोबत मांजात अडकून मृत होण्याचे प्रमाण वाढल्याचेही प्राणिमित्र संघटनांचे म्हणणे आहे.
...
सण-उत्सव साजरा करताना पशुपक्ष्यांच्या सुरक्षेचीदेखील काळजी घ्यायला हवी. पतंग उडवण्यासाठी प्लास्टिकच्या मांजाचा वापर टाळायला हवा; मात्र नागरिक या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा घटना घडत असतात.
- डॉ. मयूर डंगर, रुग्णालय व्यवस्थापक, बैलघोडा रुग्णालय, परळ