निर्देशांक उसळले; निफ्टी १८ हजारांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निर्देशांक उसळले; निफ्टी १८ हजारांवर
निर्देशांक उसळले; निफ्टी १८ हजारांवर

निर्देशांक उसळले; निफ्टी १८ हजारांवर

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : एफएमसीजी, ऊर्जा व कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर खरेदीच्या जोरावर आज भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी सुमारे एक टक्क्याच्या आसपास उसळी घेतली. १५८.४५ अंश वाढलेला निफ्टी पुन्हा १८ हजारांवर गेला; तर सेन्सेक्सही ५६२.७५ अंशांनी वाढला. आज केवळ सरकारी बँका तसेच वित्तसंस्थांचे शेअर फारसे नफ्यात नव्हते. तरीही तेजीमुळे कालचा तोटा भरून निघाला.

मंगळवारी व्यवहार सुरू होताना निर्देशांक थंडच होते; मात्र नंतर दिवसभरात सेन्सेक्स केव्हाही ६० हजारांच्या खाली गेला नाही. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०,६५५.७२ अंशांवर; तर निफ्टी १८,०५३.३० अंशांवर स्थिरावला. आज सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी स्टेट बँक, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, विप्रो, टाटा स्टील, बजाज फायनान्स या शेअरचे भाव अर्धा ते दीड टक्का घसरले. लार्सन अँड टुब्रो साडेतीन टक्के आणि हिंदुस्थान युनिलिव्हर पावणेदोन टक्क्यांनी वाढला; तर एचडीएफसी, एचसीएल टेक, एचडीएफसी बँकेचा भाव दीड टक्क्याने वाढला. रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्र, मारुती, इन्फोसिस, नेस्ले, एअरटेल, एशियन पेंट, आयटीसी या शेअरचे भावही एक टक्क्याने वाढले.

गेले काही दिवस शेअरबाजार तोट्यात होते; मात्र आता चिनी अर्थव्यवस्था खुली होत असल्याच्या तसेच अमेरिकेतील चलनवाढ घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय शेअरबाजार नफा दाखवत आहेत. तरीही गुंतवणूकदार अजूनही किंचित साशंक आहेत.
- श्रीकांत चौहान, कोटक सिक्युरिटीज