हिंदी साहित्य अकादमीच्या वर्णीवरून वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी साहित्य अकादमीच्या वर्णीवरून वाद
हिंदी साहित्य अकादमीच्या वर्णीवरून वाद

हिंदी साहित्य अकादमीच्या वर्णीवरून वाद

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ ः महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या समितीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यात भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारांच्या अनेकांची वर्णी लावण्यात आली आहे. यात अनेकांचे हिंदी भाषेत कोणतेही भरीव योगदान नाही. अथवा उल्लेखनीय असे कार्य नसल्याने या निवड प्रक्रियेत तत्ज्ञांचा मोठा अभाव असल्याचे बोलले जात आहे.

पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने समितीची पुनर्रचना करून त्या ठिकाणी कार्याध्यक्ष, सचिव आणि अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यासाठी शासन आदेश जारी केला आहे. त्यामध्ये मंत्री (सांस्कृतिक कार्य) हे अध्यक्ष असतील; तर सदस्यपदी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव आणि सदस्य सचिव हे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे सहसंचालक असतील. त्यासोबत अशासकीय सदस्य म्हणून २८ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात हिंदी आणि साहित्य यात कोणतेही भरीव आणि उल्लेखनीय योगदान नाही अशा अनेकांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे या हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी व उत्तेजनासाठी निवडण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या यादीतील नावांवरून मंत्रालयात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात अनेक हिंदी भाषेतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि त्यात योगदान असलेल्या लोकांची निवड सांस्कृतिक विभागाने का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.