राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या याचिकेवर फेब्रुवारीत सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊत यांच्या जामिनाविरोधात
ईडीच्या याचिकेवर फेब्रुवारीत सुनावणी
राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या याचिकेवर फेब्रुवारीत सुनावणी

राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या याचिकेवर फेब्रुवारीत सुनावणी

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात जामीन मिळालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या याचिकेवर ३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राऊत यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. तसेच राऊत यांच्या अटकेबाबत आणि एकूणच तपासाबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. विशेष न्यायालयाने केलेले भाष्य आणि शेरेबाजी अकारण आहे आणि उच्च न्यायालयाने ते रद्दबातल करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली; मात्र आज पुन्हा याचिकेवर रीतसर सुनावणी झाली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे. यापूर्वी दोन वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आजदेखील न्यायालयाने पुढील सुनावणी ३ फेब्रुवारीला निश्चित केली आहे.